खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद हे मेहनतीचे फळ – संतोष गोसावी

अणसूर पाल हायस्कूल येथे वेंगुर्ला तालुका शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय कॅरम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम -सर्वेश मेस्त्री (पाटकर हाय.), द्वितीय-गौरव सावंत (वेंगुर्ला हाय.), तृतीय-अथर्व राणे (आसोली हाय.), रमाकांत नवार, आदर्श चव्हाण, विधिश शेटकर, मुलींच्या गटात प्रथम- अनुजा मेस्त्री (तुळस हाय.), द्वितीय-सुधीर परब (तुळस), तृतीय-जोया बागवान (वेंगुर्ला हाय.), प्रांजल माडकर, वेदांती नवार, दुर्वांका गावडे, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम-अथर्व तेंडोलकर (वेतोरे हाय.), द्वितीय-अरमान शेख (एम.आर.देसाई), तृतीय-तन्मय कुडव (आसोली), धनराज पायनाईक, प्रतिक परब, लक्ष्मण कोंडुरकर, मुलींच्या गटात प्रथम-भक्ती कानडे (वेतोरे हाय.), द्वितीय-पूर्वा चव्हाण (अणसूर पाल हाय.), मानसी करंगुटकर(वेंगुर्ला हाय.), यशश्री गावडे, प्रज्ञा जाधव, समिधा वसंत  पवार, १९ वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या गटात प्रथम-देवांग मल्हार, द्वितीय-फ्रँकलिन अल्मेडा, तृतीय-दर्शन लिबानी (सर्व बॅ.खर्डेकर कॉलेज), सुभाष नार्वेकर, चैतन्य तुळसकर, मुलींच्या गटात प्रथम-समिक्षा मेस्त्रीद्वितीय-रेणुका बोवलेकर, तृतीय-प्राची दाभोलकर (सर्व बॅ.खर्डेकर कॉलेज) या सर्वांना तसेच जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर व खजिनदार राजेश निर्गुण यांचा गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला  मिडटाऊनचे प्रेसिडेंट योगेश नाईक यांनी पुरस्कृत केलेले रोटरी चषक विजेत्यांना देण्यात आले. यावेळी सहसचिव संजय परब, माजी सहसचिव जयराम वायंगणकर, वेंगुर्ला क्रीडा केंद्राचे संजीवनी चव्हाण व जयवंत चुडनाईक, पंच योगेश फणसळकर, राजेश निर्गुण, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

    कॅरम स्पर्धेला खेळाडूंनी दिलेला भरघोस प्रतिसाद हा वेंगुर्ल्यातील शालेय पातळीवर क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांनी अनेक वर्षे घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे प्रतिपादन तालुका क्रीडा समितीचे सचिव व गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी बक्षिस वितरण प्रसंगी केले.

  स्पर्धा यशस्वीतेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा व वेंगुर्ला तालुका कॅरम असोसिएशन, वेंगुर्ला नगरपालिका, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन, महालक्ष्मी अॅग्रो प्रॉडक्ट पाल, सर्व शाळांतील क्रिडा प्रशिक्षक व मुख्याध्यापक, अणसूर पाल विकास मंडळ मुंबई, अणसूर पाल हायस्कूल व  वेंगुर्ला तालुका क्रीडा केंद्र यांचे सहकार्य लाभले. स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ, सूत्रसंचालन विजय ठाकर व  आभार संजय परब यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu