पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती सिधुदुर्ग यांनी शिफारस केलेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजातील २१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहेत. या घरकुलांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक एकूण २५ लाख २० हजार रूपयांचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बेघर असलेल्या २१ लाभार्थ्यांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी हे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा केला हता. अखेर त्याला यश आल्याने धनगर समाजाने पालकमंत्री चव्हाण यांच्याप्रती ऋण व्यक्त केले आहेत.