सर्वधर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील, देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन‘ योजना राबविण्याचे घोषित केले आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना राज्य शासनाने ही योजना जाहीर केली. या योजनेत भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ अशा एकूण १३९ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. मात्र ‘सिधुदुर्ग‘ हा पर्यटन जिल्हा असूनही ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन‘ योजनेतून सिधुदुर्गला वगळण्यात आले आहे.