शालेय मुलांना व्यावसायिक शिक्षण देणे कौतुकास्पद – बिपिन चिरमुरे 

मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल येथे २० जुलै रोजी वृक्षारोपण, मुलांना शैक्षणिक साहित्य व हिस्टरी क्लब बॅच वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर मोर्ले-पारगड येथील किल्लेदार गडकरी तथा स्टॉफ इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन चिरमुरे, मल्टिप्रॉडक्ट  इंडस्ट्रीज, बेळगांवचे कार्यकारी संचालक रमेश रायजादे, सौ.रायजादे, दै. लोकमतचे उपसंपादक महेश सरनाईक, छत्रपती शिवाजी ट्रेडचे संस्थापक मिलिद क्षिरसागर, नूतन मराठा हितवर्धक संघ, मुंबईचे अध्यक्ष प्रवीण परूळेकर, सदस्य प्रकाश मठकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सतिश गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलम गावडे, मुख्याध्यापक सुनिल जाधव आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून त्यांना शाळेत सुरू असलेल्या व्यावसायिक शिक्षणाबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच हिस्टरी क्लब बॅचचे वाटप करण्यात आले.

   मोठमोठ्या शाळांमध्ये जे शिक्षण मुलांना मिळत नाहीत ते आज मठसारख्या ग्रामीण भागात मुलांना मिळत आहे. त्यामुळे या शाळेतील मुले ही भाग्यवान आहेत. म्हणूनच मुलांनी आपल्या आवडीनुसार शिक्षण घ्यावे आणि त्यात आपले करियर करावे असे आवाहन बिपीन चिरमुरे यांनी केले. रमेश रायजादे यांनी देशाच्या जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भरपूर वाटा आहे. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा हा ठेवा जपा असे सांगत हिस्टरी क्लबबाबत माहिती दिली. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकावर भर देऊन मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरू केलेले उपक्रम हे खुप कौतुकास्पद असल्याचे महेश सरनाईक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी घेण्यात येणा­या प्रत्येक उपक्रमात नूतन मराठा हितवर्धक संघ, मुंबईचे सहकार्य राहील, असे प्रवीण परूळेकर म्हणाले.

   या कार्यक्रमाला विद्यार्थी व ग्रामस्थ शिवराम मठकर यांच्यासह लिपिक अतुल वाडोकार, नरेंद्र नाईक, अनिकेत कांबळे, कॉज टू कनेक्टचे राजेश कांबळी, दत्तप्रसाद सांगेलकर, प्रतिक्षा पोईपकर, प्रियांका पेडणेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक गणुराज गोसावी यांनी तर आभार शिक्षिका स्वप्नाली कांबळी यांनी मानले. 

 

Leave a Reply

Close Menu