शिक्षकांची भेट घेऊन व्यक्त केली कृतज्ञता

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्ञानदानाचे कार्य केलेल्या मेघा पाटकर, मोहिनी पेडणेकर, वि.म.पेडणेकर, राजेंद्र बेहरे, आनंद पेडणेकर, सुहासिनी अंधारी या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत गुरूपौर्णिमा साजरी केली. तर यातील ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका मोहिनी पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निखिल घोटगे, उन्मेश वेंगुर्लेकर, राहूल मोर्डेकर, जितेंद्र सामंत, चेतन ठोंबरे, भैय्या गुरव, सोहम भगत व सुशेन बोवलेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu