वेंगुर्ला येथे नवीन जेटी प्रकल्पासाठी ३५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात ‘ताज‘ हॉटेलसह दोन पंचतारांकित हॉटेल्स, स्कुबा डायव्हिग प्रकल्प, तेरेखोल नदीपात्र व तारकर्ली खाडीत हाऊसबोट प्रकल्प असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहेत. या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सिधुदुर्गात सी वर्ल्ड प्रकल्प होणे आवश्यक असून रेडीतील टाटा मेटॅलिक प्रकल्पाच्या जागेत हा प्रकल्प होऊ शकतो. त्यासाठी खासदार नारायण राणे यांनी विचार करावा. नवी मुंबईत कांदळवनाचा पर्यटन प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर आरोंदा येथेही प्रकल्प होणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.