असंघटित बांधकाम कामगार नोंदणी कक्षाचा शुभारंभ

 महाराष्ट्र शासनाने राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांसाठी केलेल्या योजनेचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांना व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनेनुसार वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेतर्फे असंघटित बांधकाम कामगारांची या योजनेसाठी मोफत नावनोंदणी व मोफत नूतनीकरणासाठीचा कक्ष वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यालयात २३ जुलैपासून सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते नोंदणीचे फॉर्म वितरित करून झाला. यावेळी तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर महिला संघटक अॅड.श्रध्दा बाविस्कर, अल्पसंख्यांक महिला शहर प्रमुख शबाना शेख, महिला संघटक मनाली परब, शहर युवक प्रमुख संतोष परब, बांधकाम कामगार प्रतिनिधी किरण कुबल, प्रभाकर पडते, संजय परब, बाळा परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu