किशोरवयीन मुलामुलींसाठी व्याख्यान संपन्न

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व इनरव्हिल क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला हायस्कूल येथे वयात येताना-किशोरवयीन मुलामुलींच्या पालकांनी व स्वतः विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजीयाबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. यात प्रसिद्ध आहारतज्ज्ञ विनया बाड यांनी बदलत्या जीवनशैली व ऋतुमानानुसार दररोजचा घ्यावयाच्या समतोल आहाराविषयी मार्गदशर्न केले. यावेळी रोटरीचे योगेश नाईक, अॅड.प्रथमेश नाईक, आनंद बोवलेकर, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट मंजुषा आरोलकर, ज्योती देसाई, वृंदा गवंडळकर, मुख्याध्यापक पी.डी.कांबळे आदी उपस्थित होते. विनया बाड यांचा रोटारीतर्फे योगेश नाईक यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. प्रास्ताविक प्रा.वसंतराव पाटोळे यांनी तर आभार मंजुषा आरोलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी सदस्य व इनरव्हिल क्लब सदस्य पूनम बोवलेकर, वृंदा गवंडळकर, रेखा नाईक, गौरी मराठे, ज्योती देसाई, रसिका मठकर, दीपाली वाडेकर, सई चव्हाण यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Close Menu