सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून वेंगुर्ला पार्सेकर दत्त मंदिर येथे श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या गायकांनी तसेच सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, संगीत अलंकार डॉ.श्रीराम दीक्षित, संगीत विशारद भास्कर मेस्त्री, विशारद केतकी सावंत यांनी आपल्या सुश्राव्य संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर याच देवालयाच्या माडीवर श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचा (शाखा-वेंगुर्ला) शुभारंभ निलेश मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यालयाच्या माध्यमातून शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, हार्मोनियम व तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण तसेच गांधर्व महाविद्यालयाचा प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंतच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची शिकवणी घेतली जाणार आहे. दर शनिवार-रविवार तबला विशारद निरज भोसले, हार्मोनियम विशारद मंगेश मेस्त्री, संगीत विशारद भास्कर मेस्त्री हे संगीताचे धडे देणार आहेत. शुभारंभप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे-परब, प्राचार्य एम.बी.चौगुले, सामाजिक कार्यकर्ते राहूल प्रभूसाळगावकर, तबला वादक किशोर सावंत, सोमा सावंत, डॉ. श्रीराम दीक्षित, माजी नगरसेविका अॅड.सुषमा खानोलकर, श्रेया मयेकर, हेमंत खानोलकर, पुजा दळवी, अॅड.सिद्धी परब, नितीन धामापुरकर, मानसी भोसले, भावना सावंत, श्रीकांत जोशी, सोनाली प्रभूसाळगावकर, दत्ता कुळकर, केतकी सावंत, सर्वेश राऊळ, गोविंद मळगावकर, स्वप्निल राऊळऋतिक परब, वैभव परब आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निरज भोसले, स्वागत भास्कर मेस्त्री यांनी केले. सूत्रसंचलन विनायक गांवस यांनी केले. तर आभार मंगेश मेस्त्री यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu