चौदा दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

  वेंगुर्ला शहरासह परिसरात वाहतुकीचे नियम मोडणा­-या  १४ दुचाकी चालकांवर वेंगुर्ला न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली. सदर कारवाई वेंगुर्ला वाहतूक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी केली होती. बेदरकार वाहने चालविल्यामुळे होणा­या अपघातात स्वतःचे तसेच इतरांचे नुकसान होणार असून प्रत्येक वाहनधारकांनी वाहनांचे नियम, वेग मर्यादा पाळावी, त्याचप्रमाणे वाहनात काळ्या काचांचा वापर टाळावा, रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन प्रत्येक वाहनधारकांनी आपली वाहने चालवावीत, असे आवाहन पलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलीस मनोज परूळेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu