कॅम्प – वेंगुर्ले येथील रहिवाशी श्री. चंद्रकांत गावडे यांची कन्या कु. तेजस्विनी गावडे हिने भौतकशास्त्र या विषयामधून राष्ट्रीय वांतरिक्ष प्रयोगशालाए, बेंगलोर या संस्थेमधून पी.एच.डी.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे. कु. तेजस्विनी हिचे शालेय शिक्षण वेंगुर्ला हायस्कूल मधून तर बी.एस.सी. पदवी शिक्षण बॅ. खर्डेकर महाविद्यालयातून झाले. तिच्या या यशाबद्दल पालक व मित्रपरिवारामधून अभिनंदन होत आहे.