विविध उपक्रमांनी माजी आम.राजन तेलींचा वाढदिवस साजरा

माजी आमदार तथा भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांचा वाढदिवस वेंगुर्ला येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, गरीबांना धान्य, छत्र्या वाटप असे विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. बॅ.खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य एम.बी.चौगुले व भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुरेंद्र चव्हाण, विरेंद्र देसाई, डॉ.विलास देऊलकर, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडीस, बाबली वायंगणकर, सुजाता पडवळ, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, पपू परब, सायमन आल्मेडा, सत्यवान पालव, मनोहर तांडेल, हेमंत गावडे, रवी शिरसाट, हसिनाबेन मकानदार, आकांक्षा परब, रसिका मठकर, प्रा.अरविद बिराजदार, प्रा.वसंत नंदगिरीकर, प्रा.दिलीप शितोळे, प्रा.पी.जी.देसाई, मोहन मोबारकर, इंद्रनिल चौगुले, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

      तर उभादांडा नं.१ शाळेत सामाजिक कार्यकर्ते हितेश धुरी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने मुलांना दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले.  यावेळी किशोर नरसुले, दाजी धुरी, मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडीस, भूषण आंगचेकर, अस्मिता मेस्त्री, अंकिता केरकर, शुभांगी साळगावकर, संकेत धुरी, प्रशांत तिरोडकर, सुयश कांबळी, प्रणव धुरी, दीपेश केरकर, हेमंत धुरी, सुधीर डिचोलकर, देवेंद्र नाईक, श्रीकृष्ण मांजरेकर, प्रितम केळुसकर, साळगावकर, अंकिता तिरोडकर, आनंद मेस्त्री, दत्ता भाईडकर, हरिश्चंद्र केळुसकर, अनिल भाईडकर, अशोक भोजनाईक, जयेश राजाध्यक्ष यांसह शिक्षक व पालक उपस्थित होते. दरम्यान गुरूपौर्णिमेनिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे मुख्याध्यापक गणेश चव्हाण, शिक्षक अनिशा झोरे, सुहास रेडेकर, युनूस पठाण, पोलीस पाटील विजय नार्वेकर, पत्रकार दाजी नाईक, इंग्लिश स्पिकिग कोर्सचे सुनील कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन हितेश धुरी यांनी तर आभार गणेश चव्हाण यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu