वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा‘ हे अभियान राबविण्यात येत असून राष्ट्रध्वजास समर्पित राष्ट्रभक्तीच्या भावनेने 13 ऑगस्ट रोजी दाभोली नाका ते बॅ.खर्डेकर महाविद्यालयापर्यंत ‘तिरंगा दौड‘ काढण्यात आली. यात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आदी सहभागी झाले होते. दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय-हॉस्पीटल नाका-पॉवर हाऊस-शिरोडा नाका- जुना बस स्टँड-दाभोली नाका-नगरपरिषद कार्यालय या मार्गावर ‘तिरंगा मोटारसायकल रॅली‘ काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, प्राध्यापक, क्रिडा शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. घोडेबांव उद्यान येथे तिरंगा शपथ घेण्यात आली. तर वेंगुर्ला नगरपरिषद नागरी सुविधा केंद्रासमोर तिरंगा कॅनव्हास तयार करण्यात आला असून त्यावर नागररिकांनी स्वाक्षरी व घोषवाक्ये नोंदविली आहेत. नागरिकांनी आपल्या घरावरील राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून किवा वेंगुर्ला नगरपरिषद नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी तयार केलेल्या सेल्फि पॉईंट येथे फोटो काढून तो harghartiranga.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा व ‘घरोघरी तिरंगा‘ या उपक्रमामध्ये सर्व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.