बँकेचे आर्थिक क्षेत्र विस्तारून अधिकाधिक नागरिक, विशेषतः महिलांना उद्योग, व्यवसाय व बचतीच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘बँक सखी‘ योजना सुरू केली आहे. याचा शुभारंभ १३ ऑगस्ट रोजी सिधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा कांचन परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँक अध्यक्ष मनिष दळवी, आमदार नीतेश राणे, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय सचिव वर्षा पवार-तावडे, नाबार्डच्या दिपाली माळी, नीता राणे, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, विद्याधर परब, प्रकाश बोडस, समिर सावंत, श्वेता कोरगांवकर, सरोज परब, मेघा गांगण, प्रज्ञा परब, रविद्र मडगांवकर, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धतेसाठी सिधुदुर्ग जिल्हा बँकेने सुरू केलेली ‘बँक सखी‘ योजना स्तुत्य आहे. परंतु, यावर थांबून चालणार नाही, तर या योजनेप्रमाणेच नागरिकांना पारंपरिक व्यवसायातून बाहेर काढून टेक्नॉलॉजीकडे वळवावे, समाजसेवी प्रकल्प उभे करावेत, असे आवाहन कांचन परूळेकर यांनी केले. बँक सखी या योजनेंतर्गत १०० महिला ‘बँक सखी‘ म्हणून काम करणार आहेत. या महिला गावागावात, घरोघरी जाऊन बँक सेवा देणार आहेत. यामध्ये कर्ज सुविधेची माहिती देणे, बचत करण्याची सवय आणि बँकेच्या विविध सेवा देण्याचे काम करणार आहेत. या कार्यक्रमात १७ बँक सखींना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. तसेच बँकेच यशोगाथा दाखविणारा लघुपटही दाखविण्यात आला. लघुपटाची निर्मिती करणाया मानसी देवधर आणि योजनेला सहाय्य करणारे जीवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक नीलेश वालावलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.