आयडियल चेस अॅकॅडमी वेंगुर्लातर्फे सिद्धिविनायक मंगल कार्यालयात वेंगुर्ला तालुका मर्यादित १४ वर्षाखालील मुलामुलींच्या घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळातून एकाग्रता वाढते तसेच संयमही राखता येतो. आपल्यातील खेळाला दिशा देण्यासाठी हेच वय महत्त्वाच असते असे प्रतिपादन श्री. गिरप यांनी केले. उद्घाटनप्रसंगी स्पर्धेचे आयोजक नागेश धारगळकर, युवासेना वेंगुर्ला शहर प्रमुख संतोष परब, प्रदीफमार प्रभू, श्रीकृष्ण आडेलकर, सौरभ धारगळकर, ज्ञानेश्वर हरमलकर, उदय मालंडकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेत रूद्र मोबारकर-प्रथम, गौरांग मांजरेकर-द्वितीय, रणवीरसिग रावळ-तृतीय, स्वामी सातोसकर-चतुर्थ, सन्मील सातार्डेकर याने पाचवा क्रमांक पटकाविला. तर दुर्वांक मलबारी, हर्षवर्धन शिरगांवकर, यशराज पोतदार, प्रियांशू जानकर, गुरूराज शेणवी यांनीही यश मिळविले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी परिक्षक प्रदीफमार प्रभू, श्रीकृष्ण आडेलकर यांसह ज्ञानेश्वर हरमलकर यांचे सहकार्य लाभले.
