आसोली हायस्कूल, परबवाडा नं.१ प्रथम

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या समुहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्ते भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे घेण्यात आली. स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम-आसोली हायस्कूल, द्वितीय-सातेरी हायस्कूल वेतोरे, तृतीय-रा.कृ.पाटकर हायस्कूल, उत्तेजनार्थ-शिवाजी हायस्कूल तुळस व न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा तर प्राथमिक गटात प्रथम -परबवाडा नं.१, द्वितीय-वेंगुर्ला नं.१, तृतीय-आडेली नं.१, उत्तेजनार्थ-वेंगुर्ला नं.४ व वेंगुर्ला व वेंगुर्ला नं.३ यांनी क्रमांक पटकाविले. माध्यमिक गटात ११ तर प्राथमिक गटात १० संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे बक्षिस वितरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव काळे यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले. परिक्षण अक्षय सरवणकर व केतकी सावंत यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई आणि भाजपा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी तर आभार प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu