देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून वाहवा

वेंगुर्ला न.प.मार्फत घरोघरी तिरंगाअंतर्गत कालेलकर सभागृहात तिरंगा शपथ घेण्यात आली. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूल, सिधुदुर्ग विद्यानिकेतन, शिवाजी प्रागतिक शाळा, वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२ व वेंगुर्ला नं.४ या शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहगीत व समुहनृत्य सादर करीत उपस्थितांकडून वाहवा मिळविली.

    भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणा­या महानायकांच्या वेशभूषा स्पर्धेत पहिली ते चौथी गटात शहरातून ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात रघुवीर काणेकर (प्रथम), अनन्या नंदगिरीकर (द्वितीय), प्राची मिसाळ (तृतीय), आदर्श पवार व प्रसन्ना बर्वे (उत्तेजनार्थ) यांनी तर इयत्ता पाचवी ते दहावी या गटामध्ये एकूण ५ स्पर्धक सहभागी झाले होते. यात स्नेहल चुडजी (प्रथम), ओजस पाडगांवकर (द्वितीय), खुशी मठकर (तृतीय) यांनी बक्षिस पटकाविले. परिक्षण प्रा.डॉ.धनश्री पाटील व कैवल्य पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.डॉ.धनश्री पाटील, परिविक्षाधिन मुख्याधिकारी श्री.थोरात, कैवल्य पवार, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, सत्यवान साटेलकर व महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu