स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केटइमारतीवर मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तिरंगा ट्रीब्युटया उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.  

    नगरपरिषदेतर्फे घेतलेल्या भित्तीचित्र महोत्सवातील अक्षय जाधव (प्रथम), गोविद सावंत (द्वितीय), आदित्य गावडे (तृतीय), सिद्धेश प्रभू व अमृत जामदार (उत्तेजनार्थ) यांना तसेच वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तर स्वातंत्र्यसेनानी कै.बाळकृष्ण पडवळ यांचे वारसदार विलास पडवळ यांचा मुख्याधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषदेस विविध पुरस्कार व मानांकने प्राप्त होण्यासाठी मोलाची भूमिका बजाविणा­यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता कर्मचा­यांमधून बाबूराव जाधव, धनंजय काळसेकर व मोतीराम जाधव यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान केला. शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा­या सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचा­यांचासुद्धा सन्मान करण्यात आला. तिरंगा शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रतिक थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, उमेश येरम, श्रेया मयेकर व प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल उपस्थित होते. सुत्रसंचालन वैभव म्हाकवेकर यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu