वेंगुर्ला-गाडीअड्डा येथे एकावर एक असे चार थर रचत गोविंदांनी दहीहंडी फोडली. ‘‘गोविंदा रे गोपाळा‘‘ च्या जयघोषात युवाईने जल्लोष केला. नागरिकांनीही येथे उपस्थित राहत गोविंदांना साथ दिली. वेंगुर्ला शहरासह तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेंगुर्ला सातेरी व्यायाम शाळेतर्फेही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. व्यायाम शाळेसमोर दहीहंडी बांधून व्यायामपटूंनी ही दहीहंडी फोडली. ज्यांच्या ज्यांच्या घरी श्रीकृष्ण मूर्ती पूजन केले होते तेथेही विसर्जन करण्यात आले. शेवटी दहिकाल्याचा प्रसाद वाटप करून या उत्सवाची सांगता झाली.