पुस्तकहंडीतून मुलांनी दिला ज्ञानाचा वसा

डिजिटल युगात प्रगतीचे बीज रूजत असताना सोशल मिडियाच्या माध्यमातून विघातक आणि वाईट गोष्टींच्या विळख्यात तरूणांसह लहान मुलेही अडकत आहेत. समाजाकडे मुलांना निकोप आणि प्रगल्भ समाजाभिमुख दृष्टीने पहायला शिकवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वेंगुर्ला येथील मुक्तांगणतर्फे मुलांमध्ये वाचनसंस्कार रूजावा या हेतूने पुस्तकहंडी हा उपक्रम गोकुळाष्टमीचे औचित्य साधून घेण्यात आला. मुक्तांगणच्या मुलांनी कृष्णाचे सवंगडी होऊन पुस्तकरूपी हंडीतून एकमेकांना ज्ञानाचा वसा दिला. याच कार्यक्रमात मुक्तांगण महिला मंचाच्या रचना गावउे, स्वाती बांदेकर, मंजिरी केळजी, माहेश्वरी गवंडे, साक्षी वेंगुर्लेकर, माधवी मातोंडकर, संजना तेंडोलकर व दिव्या आजगांवकर यांनी आपल्या कृष्ण भजनाने कार्यक्रमास रंगत आणली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर, सहाय्यक शिक्षिका प्रिती राऊत, निलांगी करंगुटकर, श्रीनिवास सौदागर यांनी विशेष मेहनत घेतली. गोपाळकृष्णाच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Close Menu