वेंगुर्ला येथील प.पू.भास्कर पंत वागळे महाराज यांच्या १००व्या पुण्यतिथी निमित्त शहरात पालखी दिंडी सोहळ्यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. २४ ऑगस्ट रोजी सकाळी जुना स्टॅण्ड येथील श्री देव गणपती मंदिर येथून पालखी दिडी सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी ढोल पथक आणि लहान मुलांसह वारकरी यांचे भजन यांच्या साथीने ही पालखी दाभोली नाका व बाजारपेठ मार्गे गाडीअड्डा नाका, रवळनाथ मंदिर व रामेश्वर मंदिर करून माघारी गावडेश्वर व शिरोडा नाका येथून जुना स्टँडवरून गावडेवाडी नंतर श्री देव नारायण मंदिर येथे पोहचली. यानंतर या मंदिरात श्री देव सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. भाविकांना महाप्रसादही देण्यात आला. तसेच संध्याकाळी सुगमसंगित तसेच भजने असा कार्यक्रम पार पडला. हा सोहळा चांगला होण्यासाठी श्री जय हनुमान मित्र मंडळ गावडेवाडी आणि ग्रामस्थांनी खूप परिश्रम घेतले.