वेंगुर्ला हिदी प्रचार सभा हिदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी आदर्श शिक्षक आणि शिक्षिका पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान करतात. यावर्षी कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वेंगुर्ला शाळा नं.२च्या शिक्षिका नीना मार्गी यांना तर कै.श्रीपाद कृश्ण पुराणिक यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांना जाहीर झाले आहेत. सदरचे पुरस्कार लवकरच एका विशेष कार्यक्रमात वितरीत करणार असल्याची माहिती अध्यक्ष का.हु.शेख यांनी दिली.