कोकण रेल्वे आरपीएफ कणकवलीचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांनी नुकतीच वेंगुर्ला येथील साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग या संस्थेला भेट देत दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग बांधवांशी संवाद साधला. त्यांना रेल्वे प्रवासात येणाया अडचणी जाणून घेत रेल्वे प्रवासाबाबत दिव्यांगांना सर्वोतोपरी सहकार्य करून जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन निरिक्षक राजेश सुरवाडे यांनी दिले. याप्रसंगी साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी राजेश सुरवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार तर संगीत विशारद पदवी प्राप्त सचिन पालव या दिव्यांग बंधूंचा सत्कार निरिक्षक राजेश सुरवाडे यांनी केला. तसेच त्यांनी इतर दिव्यांग गुणवंतांना बक्षिस देत शुभेच्छा दिल्या. यावेळी दिव्यांग विकास केंद्र वेंगुर्ल्याच्या सचिव प्रणिता पेंडसे, विश्वस्त ज्योती मडकईकर, सदस्य सचिन पालव, श्रुती पाटील, सुनंदा मोकाशी, दिव्यांग बांधव व हितचितक उपस्थित होते.