जनसेवा प्रतिष्ठानतर्फे राकेश धर्णे यांचा सत्कार

आडेली येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश यशवंत धर्णे यांची अलिकडेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या विशेष कोट्यातून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. त्याबद्दल जनसेवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉ. संजिव लिगवत यांच्या हस्ते राकेश धर्णे यांचा शालसन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

      राकेश धर्णे यांनी जिल्ह्यात आरोग्य शिबिररक्तदान शिबिरगरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य व साहित्य वाटप आदी कार्यात योगदान दिलेले आहे. तसेच ते सध्या सहकारी संस्थाचे शासकीय प्रमाणित लेखापरिक्षक असून सार्वजनिक विश्वस्त संस्थांचे अधिकृत लेखापरीक्षक म्हणून महराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत. त्यांनी होमगार्ड कार्यालय वेंगुर्लाचे समादेशक अधिकारी म्हणून काम केलेले असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक कार्यात अग्रसर आहेत. या सत्कारप्रसंगी जनसेवा  प्रतिष्ठानच्या  सचिव  डॉ. सई लिंगवत उपस्थित होत्या.

Leave a Reply

Close Menu