महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ नगरविकास विभाग अधिसूचना-पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम) अधिनियम, २०१४ मधील नियम १६ अंतर्गत अनुसूची ०९, कलम ११ नुसार उमेदवारांची संख्या निवडून यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
यामध्ये इतर मागास वर्गामधून विजय मुणनकर, अनुसूचित जाती महिलांमधून गौतमी जाधव, अल्पसंख्यांक महिलांमधून लुसिया आरावूज, सर्वसाधारणमधून अशोक पिगुळकर, सुभान दादाभाई व मृणाली कौलगेकर तर विकलांग / दिव्यांगमधून अनिल नाईक यांचा समावेश आहे. या बिनविरोध झालेल्या सदस्यांचे वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे अभिनंदन करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सागर साळुंखे यांनी काम पाहिले.