‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे २९ सप्टेंबर रोजी स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचा-यांसाठी एकदिवशीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
क्रिकेट स्पर्धेत कर्णधार विशाल होडावडेकर यांचा ‘वेंगुर्ला टायगर्स‘ संघ विजेता तर कर्णधार वैभव म्हाकवेकर यांचा ‘वेंगुर्ला लायन्स‘ संघ उपविजेता ठरला. मालिकावीर म्हणून मैनुद्दीन धारवाडकर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून वैभव म्हाकवेकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शैलेश सातार्डेकर यांनी बक्षिसे पटकाविली. पंच म्हणून सुधीर सारंग व उदय म्हाडदळकर यांनी काम पाहिले. या स्पर्धे दरम्यान, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व माजी नगरसेवक प्रशांतज आपटे यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यानंतर घेतलेल्या कबड्डी स्पर्धेत विशाल होडावडेकर यांचा ‘सेव्हन स्टार‘ संघ विजेता तर हेमंत चव्हाण यांचा ‘रायझिग स्टार‘ संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओंकार गोहर याने वैयक्तिक पारितोषिक प्राप्त केले. पंच म्हणून जयवंत चुडनाईक काम पाहिले. तर माजी नगरसवक उमेश येरम यांनी या स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. दोन्ही स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यापुढेही स्वच्छता मित्रांसाठी नाविन्यपूर्ण मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.