धोकमेश्वरतर्फे विविध स्पर्धा संपन्न

वेंगुर्ला येथील क्षणभर विश्रांती व धोकमेश्वर मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त दिवाळी नाईट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका प्राजक्ता परब यांच्या हस्ते झाल. यावेळी संतोष परब, प्रणय सावंत, अथर्व परब, साहिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोलो नृत्य स्पर्धा, मायलेक नृत्य स्पर्धा, होम मिनिस्टर आणि फॅशन शो-व्यक्तिमत्त्व स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- सोलो नृत्य स्पर्धा-प्रथम आकांक्षा परब, व्दितीय-कुंदन परब, तृतीय – निहिरा पाटणकर, मायलेक नृत्य स्पर्धा-प्रथम-निधी चौगुले-श्रीशा चौगुले,व्दितीय – लावण्या परब-निशिता परब, तृतीय-जान्हवी पाटणकर-मनस्वी पाटणकर यांनी क्रमांक मिळविला. महिलांसाठी खास आकर्षण असलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत प्राजक्ता गावडे ह्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय-किर्ती परब, तृतीय-अक्षता पेडणेकर यांनी क्रमांक मिळविला. तर फॅशन शो-व्यक्तिमत्त्व स्पर्धेत निहिरा पाटणकर ही मिसेस पाटीलवाडाठरली. बार्बी गर्ल आकांक्षा परब तर चॉकलेटगर्ल निधी चौगुले ठरली. विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राजगे यांनी केले. तर स्पर्धेचे परीक्षण प्राजक्ता परब आणि प्रणय सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्षणभर विश्रांती व धोकमेश्वर मित्रमंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.

 

Leave a Reply

Close Menu