सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणे येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई गोवा विभाग अध्यक्ष तुकाराम तांबोसकर, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा कुडाळ अध्यक्ष अनिल पावसकर, तालुका शाखा वेंगुर्ला उपाध्यक्ष गजानन जाधव, प्रा.व्ही.पी.नंदगिरिकर, तालुका शाखा सावंतवाडी अध्यक्ष महेंद्र सावंत, तालुका शाखा दोडामार्ग उपाध्यक्ष हरिश्चंद्र मणेरकर आदी उपस्थित होते. भारताचा इतिहास हा क्रांतीचा व प्रतिक्रांतीचा आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनंतर सम्राट अशोक राजाने या देशात क्रांती केली. बौद्ध धम्माचे मूळ भारत देश आहे. त्यामुळे प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्माप्रती जागरूक असणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ झाली नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो दिवस होता अशोका विजयादशमीचा. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विजयादशमी दिवशी साजरा केला पाहिजे. बुद्ध धम्माचा वारसा जपला पाहिजे आणि हा वारसा वाचवण्याचे काम आपण केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.व्ही.पी.नंदगिरिकर यांनी केले.
या कार्यक्रमावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग या संस्थेला मोलाचे सहकार्य व योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्माचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंदीशा पवार, प्रास्ताविक नारायण आरोंदेकर यांनी केले तर आभार मधुकर तळवणेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य ज्ञातीबांधव उपस्थित होते.