विश्वास पवार यांचा आकाशकंदील प्रथम

सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील स्पर्धेत १०५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा तालुका स्कूल शाळा नं.१च्या मैदानावर २८ ऑक्टोबर रोजी पार पडली. उद्घाटन शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनिल मोरजकर, सचिन वालावलकर मित्रमंडळाचे पदाधिकारी अॅड.मनीष सातार्डेकर, जयेश गावडे, सचिन गावडे, पिट्या कुडपकर, आनंद रेडकर, पिटू गावडे, युवासेनेचे तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, किशोर सोन्सुरकर, भूमी अभिलेखचे कर्मचारी सुयोग सातोसकर आदी उपस्थित होते.

      स्पर्धेत विश्वास पवार यांचा आकाशकंदील प्रथम, संग्राम धुरी यांच्या आकाशकंदीलाने द्वितीय तर अणसूर येथील प्रेरणा गावडे यांच्या आकाशकंदीलाने तृतीय क्रमांक पटकाविला. नम्रता मयेकर, संजय हुले व अक्षय तेरेखोलकर यांच्या आकाशकंदीलांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण सावंतवाडीतील बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे प्रा.मिहीर शिरोडकर व धनंजय परब यांनी केले. सर्व विजेत्यांना आमचा सचिनअभिष्टचितन सोहळ्यात जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, तालुका संघटक बाळा दळवी यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. 

 

Leave a Reply

Close Menu