वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतकर्यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका, होळकर मंदिर शेजारील अॅड.प्रकाश बोवलेकर, भटवाडी येथील कल्याण सावंत, अनिल आठलेकर, आडी स्टॉप नजिकचे मेघा पाटकर यांच्या निवासस्थानी असलेल्या गाईचे पूजन करताना त्यांना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, डॉ.राजन शिरसाट, रविद्र शिरसाट आदी उपस्थित होते. दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुहासिनी वैद्य, परूळेबाजार येथील रा.स्व.संघाचे कार्यकर्ते शेखर जोशी, दाभोली येथील भाजपाचे बुथ प्रमुख अनिकेत कांबळी व गुरूनाथ कांबळी यांनी आपल्या घरी गोमातेचे पूजन करून वसुबारस साजरी केली.