विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी बाल आनंद मेळावा आवश्यक

वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलचा आनंद मेळावा २९ व ३० नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन वेंगुर्ला पोलिस निरिक्षक संदिप भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरिक्षक योगेश राठोड, बेनिता डिसोझा, फादर फ्रान्सिस डिसोझा, प्राचार्य फादर फेलिक्स लोबो, फादर ऑल्विन गोन्साल्विस, लिया मोंतेरो, सतिश वारंग, आग्नेल फर्नांडिस यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.

      विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे, देवाण-घेवाण, नफा-तोटा, विविध वस्तूंची ओळख, गर्दीतील धाडस, बोलण्याची पद्धत, पैशाची ओळख, पैशाचा हिशोब, धाडस व संयम असे गुण अशा आनंद मेळाव्यातून मिळत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात बाल आनंद मेळावा महत्त्वाची भूमिका बजावत असतो असे प्रतिपादन वेंगुर्ला पोलिस निरिक्षक संदिप भोसले यांनी केले.

    मेळाव्याच्या दुस­या दिवशी कार्यक्रमाप्रसंगी कॉन्ट्रॅक्टर जगन्नाथ दाभोलकर, राखी दाभोलकर, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते. जगन्नाथ दाभोलकर यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व सांगितले. दोन दिवसांच्या आनंद मेळाव्यात सोलो डान्स, ग्रुप डान्स, एकांकिका, नाटके, गाणी असे विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांनी आपल्यातील कलेचे दर्शन उपस्थितांना घडविले. तर बहुसंख्य नागरिकांनी या आनंद मेळाव्यादरम्यान, मांडण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. प्राचार्य फादर फेलिक्स लोबो यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu