प्रभावी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत शहरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अग्नि, जल, वायु, भूमी व आकाश या पंचतत्त्वांचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या आदेशानुसार कोकण विभागामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नियमितपणे चांगले काम केले जात आहे. याच अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेस प्रगत गुणानुक्रम मिळविण्यासाठी विविध कामांचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक उपसंचालक कार्यालयातर्फे विभागीय तांत्रिक तज्ज्ञ मंदार पाटील यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट दिली. या दरम्यान त्यांनी माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत चालू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच याबाबत प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Close Menu