कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात अभूतपूर्व स्वागत!

     विजयाची हॅट्ट्रिक साधत राज्यातील महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झालेले मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सिधुदुर्ग जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण सीमेवर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी गद केली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या तब्बल 51 जेसीबींमधून राणे यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्यासह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच राणे समर्थक उपस्थित होते.

            ‌‘स्वागत माझे होत आहे, मात्र तुम्हा सर्वांना मंत्री झाल्यासारखं वाटतयं ना?‌‘ अशी सुरूवातीलाच मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित सर्व चाहत्यांना साद घालताच सर्वांनीच हात उंचावून, जल्लोष करत त्यांना प्रतिसाद दिला.

            सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. या जिल्ह्यात तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असल्याने आता विकासकामांबाबत ‌‘नाही‌‘ हा शब्द संपला आहे. कोणतेही कारण देता येणार नाही. सहकार, शेती, ग्रामीण विकास या संकल्पना अधिक ताकदीने पुढे नेण्यासाठी आपला निर्णय स्वागतार्ह राहील, असे स्पष्ट केले. तसेच जिल्हा बँक कर्मचऱ्यांच्या अपेक्षाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील, असेही सांगितले. राज्य सरकार आणि जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून आपण काम करणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.

            वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी नितेश  राणे यांची ओरोस मुख्यालय येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शहरसेनाप्रमुख सागर गावडे, शहर संघटक उमेश आरोलकर, विशाल राऊत, बाळा पाटकर, पराग सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu