महाराष्ट्रातील बौद्धकालीन आणि प्राचीन शिल्प, वस्तूंचे प्रदर्शन विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात भरविण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रदर्शनात वेंगुर्ला येथील मांगल्याचे मठ गावच्या प्राचीन वीरगळ, सतीशिला समजून घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठे आकर्षण होते.
भारतीय पुरातत्वशास्त्राचे शिल्पकार डॉ. एस. सी. सांकालिया यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्व विभाग, बौद्धविद्या विभाग, पर्यटन मंत्रालय, लब्दी विक्रम जनसेवा ट्रस्ट, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाउंडेशन, पुरासंस्कृती आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबरपर्यंत मुंबईतील विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. त्यात विद्याथ, इतिहासप्रेमी आणि संशोधक अभ्यासकांनी अनेक गोष्टी अनुभवता आल्या.
मठ गावच्या प्राचीन वीरगळींचे मुंबईच्या प्रदर्शनात आकर्षण!
या प्रदर्शनात बौद्धकालीन सोपारा स्तुप उत्खननात सापडलेल्या वस्तू तसेच प्राचीन काळातील भांडी आणि पुराजैव शास्त्रीय नमुने होते. वीरगळ आणि सतीशिलाचे खास प्रदर्शन येथे होते. त्यात मग गावचे विरगळ आणि सती शिला समजून घेण्यासाठी नागरिकांचा कल अधिक होता.