बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाचे सात दिवशीय श्रमसंस्कार निवासी शिबिर ‘विकसित भारत‘ ही संकल्पना घेऊन १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत तुळस-खरीवाडी येथे संपन्न झाले.
उद्घाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक दादासाहेब परूळकर उपस्थित होते. दि.१९ रोजी ‘सायबर सुरक्षा आणि नशामुक्त भारत‘ याबाबत पोलिस रंजिता चौहान यांनी मार्गदर्शन केले. तर आपण आपली जबाबदारी ओळखून कोणत्याही नशेपासून दूर राहून आपले व आपल्या देशाचे भवितव्य घडवावे असा संदेश पोलिस सावी पाटील यांनी दिला. दि.२० रोजी डॉ.मिलन सावंत यांनी ‘निरोगी जगण्याची कला‘ यावर मार्गदर्शन करताना युवकांनी आहार विहार आणि व्यायाम यांचा समन्वय घडवून आणावा. जेणेकरून निरोगी तरूण देशाच्या विकासाला हातभार लावू शकतो असे सांगितले. दि. २१ रोजी प्रा.वैभव खानोलकर यांनी विकसित भारतासाठी युवकांनी काय करणे अपेक्षित आहे. हुशार, बुद्धिवान आणि सक्षम तरूणांनी आपण जिथे ज्ञान संपादन केले त्याच देशासाठी आपले कार्य करावे यासाठी त्यांनी महान व्यक्तींचा दाखले दिले. दि. २२ रोजी प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तगट आणि त्याची सविस्तर माहिती सांगताना रक्तदान करण्याची आवश्यकता सांगितली. दि.२३ रोजी स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सात दिवस चाललेल्या या श्रमसंस्कार शिबिरात श्रमाचे महत्व समजण्यासाठी तुळस गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आणि जैतिर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी श्रमदानातून दोन बंधारे घालण्यात आले.
या शिबिरासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्राचार्य एम.बी.चौगले यांचे मार्गदर्श लाभले. तर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.गावडे, डॉ.के.आर.कांबळे, डॉ.डी.एस.पाटील, सदस्य प्रा.एल.बी.नैताम, प्रा.ए.बी.नरगच्चे, डॉ.सुनिल भिसे, प्रा.सचिन परूळकर यांचे सहकार्य लाभले.