किशोर सावंत यांना आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार

ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगर वाचनालय वेंगुर्ल्याचे ग्रंथपाल किशोर सावंत यांना सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते सन २०२४चा ‘आदर्श ग्रंथालय सेवक‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  हा कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगांव येथे संपन्न झाला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल वेंगुर्ला नगर वाचनालयाचे कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांनी श्री.सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी अनिल सौदागर, अॅड. देवदत्त परूळेकर, मंगल परूळेकर, प्रा.महेश बोवलेकर, अॅड.नंदन वेंगुर्लेकर, कैवल्य पवार, दिपराज बिजितकर, माया परब, पूजा धावडे, जेनी डिसोजा, मिथून सातार्डेकर आदी उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Close Menu