प्रबोधन गोरेगांव व साप्ताहिक ‘मार्मिक‘तर्फे साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धा घेण्यात आल्या. यात कुडाळ येथील प्रसाद खानोलकर यांच्या ‘चंद्रफुल‘ कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल दै. नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, मार्मिकचे वार्षिक सभासदत्व, मार्मिक अंक आणि रोख ११ हजार रूपये देऊन प्रसाद खानोलकर यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम ११ जानेवारी रोजी गोरेगांव येथे संपन्न झाला. यावेळी प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई, प्रमुख कार्यवाह गोविंद (विजू) गावडे, अध्यक्ष नितीन शिंदे व साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर आदी उपस्थित होते. यानिमित्त डॉ.संजय उपाध्ये यांचा ‘मन करा रे प्रसन्न‘ कार्यक्रम ठेवला होता.
स्पर्धेतील द्वितीय-‘अ फ्रेंड इन नीड‘ लेखक-अशोक गोवंडे, (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिकचे १ वर्षाचे मोफत सभासदत्व व रोख रु.५०००/-), तृतीय क्रमांक- ‘अंतर्धान‘ लेखक-अमित पंडित (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिकचे १ वर्षाचे मोफत सभासदत्व व रोख रू.३०००/-), उत्ते.-‘शोध लेखक-मंगल कातकर (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिकचे १ वर्षाचे सभासदत्व आणि रोख रु. २५००/-), ‘माझी रोबॉटिक मुलाखत‘ लेखक-सुरेशचंद्र (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिकचे १ वर्षाचे सभासदत्व व रोख रु. २५००/-), ‘नावात काय आहे‘ लेखक-नवनाथ गायकर (मानचिन्ह,प्रमाणपत्र,पुस्तक, साप्ताहिक मार्मिकचे १ वर्षाचे सभासदत्व व रोख रु. २५००/-) असे आहेत.