अॅड.राहूल नार्वेकर यांची मातोंड गावाला भेट

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याने राहूल नार्वेकर यांनी मातोंड येथे येऊन आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. सिंधुदुर्गात अनेक नेते झाले. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे राजकीय हेवेदावे काही असले तरी माणसाला माणूस धावून येतो. ही राजकीय सभ्यता या जिल्ह्यात दिसून येते. असे मात्र महाराष्ट्रात कुठेही दिसून येत नाही. म्हणून हे संस्कार आणि ही सभ्यता जिल्हा कायम ठेवेल. गेल्या अनेक वर्षांपासून मातोंड गावाशी आमच्या कुटुंबाशी घट्ट नाळ आहे. येथील सातेरी देवीवर आमची नितांत श्रद्धा आहे. १०० वर्षापूर्वी आमचे कुटुंबीय इतरांप्रमाणेच रोजीरोटीसाठी म्हणून मुंबईला गेले व तेथेच स्थायिक झाले, तरी आम्ही मुळचे याच मातीतील आहोत. त्यामुळे कोकणची लाल माती आम्हाला येथे नेहमी खेचून आणते. असे राहूल नार्वेकर म्हणाले.

      यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, देवस्थान समिती अध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परब, मानकरी उदय परब, रविकिरण परब, तुकाराम परब, दिगंबर परब, दादा म्हालटकर, सुधाकर परब, सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी, डॉ.भालचंद्र कांडकर, पोलीस पाटील सागर परब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यमान सरकार अतिशय संवेदनशील सरकार आहे. लोकांच्या हिताचे अनेक निर्णय ते सातत्याने घेत राहतील. आपणही सिंधुपुत्र या नात्याने वारंवार या जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी येणार आहे. येथील प्रश्न प्राधान्याने सुटावेत यासाठी आग्रही राहणार आहे, असे अॅड.नार्वेकर यांनी केले. देवस्थानतर्फे मागण्यांचे निवेदन देत अॅड.राहूल नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu