पक्षी गणनेत ४७ प्रजातींची नोंद

सिधुदुर्गातील पाणथळ भागांमध्ये आढळणा­या पक्षांच्या प्रजातींची नोंद घेण्यासाठी वनशक्ती, बॅ.खर्डेकर महाविद्यालय आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणथळ पक्षी गणना कार्यक्रम घेण्यात आला. या गणनेत ४७ प्रजातींची नोंद झाली आहे. नोंदवलेल्या पक्षांमध्ये हरणटिटवी, पाणकोंबडी, वेडा राघू, ढोकरी, कवड्याखंड्या, मराल, थोरलाधोबी, छोटा पाणकावळा, हलदी कुंकुम, उलटचोच तुतारी, पांढरा शराटी, कबूतर, कमळपक्षी, करड्या डोक्याची मैना, करडा धोबी, काळ्या मानेचा हळद्या, कोतवाल, काळा शराटी, गायबगळा, खंड्या, वारकरी, घोंगी खंड्या, चिखली तुतारी, जांभळा सूर्यपक्षी, टिटवी, ठिफवाला तुतवार, घार, गरूड, ससाणा, पाकोळी आणि तारवाली पाकोळी यांची संख्या लक्षणीय होती. यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.धनश्री पाटील, वनशक्तीच्या करिश्मा मोहिते, पक्षी अभ्यासक जागृती गवंडे, प्रितीश लाड, हिरोजी परब आणि गौरव पालक आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu