खानोली गावचे सुपूत्र तथा दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला दशावतार‘ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई येथे भारतातील पहिले अखिल भारतीय भजन संमेलनाच्या उद्घाटन समारंभावेळी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, भजन सम्राट लोकरे बुवा, हर्याण बुवा, मालवणी कवी दादा मडकईकर आदी उपस्थित होते. लवकरच हे पुस्तक रसिकांच्या भेटीला येणार आहे.