माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गणेश मंदिर, दाभोली-कोऱ्याचीवाडी, उभादांडा गणपती मंदिर, जुना स्टँण्ड गणपती मंदिर, रेडी गणपती मंदिर येथे गणपतींचे पूजन तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. वेंगुर्ल्यातील श्री रामेश्वर मंदिरात 21 गणपतींची स्थापना, गणेश याग तसेच परिवार देवतांचे वर्धापनदिन साजरे होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.
नवाबाग येथे गणपतीची प्रतिष्ठापना, पूजन, भजन आणि महाप्रसाद असे कार्यक्रम झाले. तर यावेळी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ कुपन स्पर्धेत टॉनी फर्नांडीस (एलईडी टीव्ही), किरण राजम (मोबाईल), डॉ.खडपकर (कपाट), वैभव म्हाकवेकर (सिलिंग फॅन), सुदेश गोकरणकर (मिक्सर, गॅस शेगडी), रवी वारंग (टेबल फॅन), गुरूप्रसाद चमणकर (डायनिंग टेबल), नवीन खडपकर (स्टडी टेबल), हितांशू सादये (हेअर ड्रायर), चारवी कोळंबकर (प्रेशर कुकर), मोनिका खडपकर (इलेक्ट्रिक किटली), रोहित नाईक (डिनर सेट), अर्थव तारी (इस्त्री), गौरव आरेकर (थर्मास), टॉनी फर्नांडीस (प्लॅस्टिक खुच), प्रदिप तांडेल (स्मार्ट वॉच), विन्रमता सारंग (इलेक्ट्रॉनिक शेगडी) यांच्यासह जुई टाक्कर, सुदेश गोकरणकर, विकास आई, विनायक मांजरेकर, मुक्ता तांडेल, प्रमोद तांडेल, संगिता कुबल, योगेश मोर्जे, सुनिल राजापूरकर, रोहित नाईक, गणेश अंधारी, मेघा आरावंदेकर, राहूल नार्वेकर, कुश खराडे, विधीता सारंग यांनी आकर्षक बक्षिसे पटकाविली.
वेंगुर्ला-सुंदरभाटले येथील श्री देव वांद्रेश्वर प्रासादिक कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त रोज पूजन, भजन असे कार्यक्रम संपन्न होत आहेत. 6 फेब्रुवारी रोजी सायं. 7.30 वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ, मातोंड यांचा ‘शिव अपमान‘ हा दणदणीत नाट्यप्रयोग तर 7 फेब्रुवारी रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे.
वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प येथे असलेल्या श्री वरदविनायक मंदिरात 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान देवता पुनःप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. दि.31 रोजी श्री दत्त-विठ्ठल पायी वारकरी ह.भ.प.हरेकृष्ण पोळजी महाराज यांच्या हस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना तर श्री वरदविनायक देवता स्थापना करण्यात आली.
उत्सव कालावधीत पूजन, काकड आरती, संगीत व वारकरी भजने, हरिपाठ, महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले. बहुसंख्य भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घेतला.