जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय

सिधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून प्रशासनाचे मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. सिधुदुर्ग जिल्हा अॅथलॅटिक असोसिएशनतर्फे ११ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय अॅथलॅटिक स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी जिल्ह्यातील स्पर्धक, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु, जिल्हा क्रीडा संकुल येथे चेंजिगरूम, स्वच्छतागृहे नसल्याने सर्वांचे अतोनात हाल झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत दखल घेऊन जिल्हा क्रीडा संकुल येथे योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित प्रशासनाला आदेश द्यावेत. जेणेकरून स्पर्धकांना त्याचा फायदा होईल असे अॅड.सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे.

Leave a Reply

Close Menu