सातत्याने प्रयत्न करा, जिद्द कायम ठेवा!

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ‘जिमखाना डे‘ म्हणून नुकताच संपन्न झाला. यावेळी प्राचार्य एम.बी.चौगले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे सचिव एम.के.गावडे, रोटरी इंटरनॅशनलचे संजय पुनाळेकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा परब, जिमाखाना चेअरमन प्रा.के.आर.कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप शितोळे, विद्यार्थी प्रतिनिधी पवनकुमार राणे, प्रा.व्ही.पी.देसाई, वासुदेव गावडे, हेमंत गावडे, क्रीडा संचालक जे.वाय.नाईक आदी उपस्थित होते.

   पुरस्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र बनते. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. सातत्याने प्रयत्न करा, जिद्द कायम ठेवा असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले. खेळामुळे आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास होतो. अभ्यासाव्यतिरिक्त महाविद्यालयातील इतर उपक्रमात सहभाग व्हा. याचा तुम्हाला पुढील जीवनात उपयोग होईल, असे संजय पुनाळेकर म्हणाले. सुदृढ शरिराकरीता व आरोग्य चांगले राखण्यासाठी सतत खेळा व व्यायाम करा. सायकलिग करा असे मत प्रज्ञा परब यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आमच्या महाविद्यालयास उच्च स्तरावर नेत आहेत. खेळामध्ये भाग घेणारे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकू शकतात, असे प्रतिपादन प्रा.चौगले यांनी केले. महाविद्यालयातील सर्व वर्गातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

      कनिष्ठ विभागातून उत्कृष्ठ खेळाडू देवांग मल्हार (कॅरम), स्नेहा नार्वेकर (रायफल), दर्श शेटये (व्हॉलीबॉल) यांना प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले. वरिष्ठ विभागातून दिव्या वेंगुर्लेकर, संजना चव्हाण, पीटर फर्नांडिस यांनाही पुरस्कृत बक्षिसे देण्यात आली. क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त करणारे अॅथलेक्टिक्स मुंबई विद्यापिठ झोनल १०० मीटर हर्डल्स गोल्ड मेडल गायत्री राणे, व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापिठ झोनल सिल्व्हर मेडल सिल्वर मेडल ओंकार गोसावी, हर्ष बोवलेकर, क्रिकेटमधी सर्वोत्कृष्ट खेळाडू मुंबई विद्यापिठाच्या टीममधून निवड पिटर फर्नांडिस तसेच महाविद्यालयीन शरिरसौष्ठव स्पर्धेत जगदिश चमणकर पुरस्कृत ‘बॅ.खर्डेकर श्री‘ सागर लटम व ओम पवार यांना प्रमाणपत्र व ट्राॅफी देऊन सन्मानित केले. सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळकर, अहवाल वाचन प्रा.जे.वाय.नाईक व प्रा.व्ही.एम.पाटोळे यांनी तर आभार हेमंत गावडे यांनी मानले. 

Leave a Reply

Close Menu