काव्यगायनात गाथा कोळंबकर प्रथम

कवी कुसुमाग्रज यांच्या २७ फेब्रुवारी या जन्मदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेतर्फे पाचवी ते सातवीतील मुलांसाठी त्यांच्या पाठ्यपुस्तकातील काव्यगायन स्पर्धा घेण्यात आली. यात २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत नवाबाग शाळेच्या गाथा कोळंबकर हिने प्रथम, वेंगुर्ला नं.२च्या दुर्वा गावडे हिने द्वितीय तर वेंगुर्ला हायस्कूलच्या भार्गवी यादव हिने तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे ५००, ३०० व २०० अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण कैवल्य पवार आणि भाऊ करंगुटकर यांनी केले. कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यवाह कैवल्य पवार, सदस्य महेश बोवलेकर यांच्यासह ललिता जाधव, विद्यार्थी, पालक, शिक्षक, सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu