जबरदस्तचा ‌‘गरूडझेप महोत्सव‌’ उत्साहात संपन्न

राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाचा ‌‘गरूडझेप महोत्सव 2025‌‘ 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि लोकोपयोगी उपक्रमांनी संपन्न झाला. ‌‘मिना पार्क‌’ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 35 जणांनी रक्तदान केले. उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी सतिश डुबळे यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक यशवंत किनळेकर तसेच गोपिका राऊळ, अरूणा माडये, मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले. सर्व रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रात्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‌‘अहम्‌‍‍ब्रम्हांडजय‌‘ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग झाला.

      1 मार्च रोजी अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रूग्णालय, वेंगुर्ला येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 115 रूग्णांची तपासणी करून त्यातील आवश्यक रूग्णांना कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी बोलाविण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या हस्ते आणि डॉ.संदिप सावंत, अथायुचे विशाल पाटील, मदन गोरे, डॉ.किरण यांच्या उपस्थितीत झाले.

      याच दिवशी रात्री घेतलेल्या तालुकास्तरीय ग्रुपडान्स स्पर्धेत परबवाडा सी ग्रुपने प्रथम, वेंगुर्ला शाळा नं.1ने द्वितीय तर वेंगुर्ला शाळा नं.4 ने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण रेश्मा वरसकर आणि उर्मिला पेडणेकर यांनी केले. विजेत्यांना शिंदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि वेंगुर्ला शहरप्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते अनुक्रमे 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार तसेच आकर्षक चषक  देऊन गौरविण्यात आले. यावेळी वासुदेव परब, राजू परब, आनंद रेडकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि शिक्षक व पालक उपस्थित होते. यानंतर महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. यात निहारिका होळकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर अदिती तावडे-द्वितीय, मेघना राऊळ-तृतीय, मेधा वेंगुर्लेकर-चतुर्थ, अनुराधा तेरेखोलकर-पाचवा आणि गोपिका राऊळ यांनी सहावा क्रमांक पटकाविला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे निवेदन शुभम धुरी यांनी केले.

      दि.2 मार्च रोजी वेंगुर्ला शाळा नं.4 येथे रंगभरण व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख रूपेश राऊळ उपस्थित होते. रंगभरण (1ली ते 2री) गटात प्रथम-अन्वय सापळे, द्वितीय-तनिषा सातार्डेकर, तृतीय-आराध्या राऊळ,  चित्रकला – तिसरी ते चौथी गटात प्रथम-वरद ताम्हणकर, द्वितीय-रूजुल सातोसकर, तृतीय-सार्थक मालवणकर, पाचवी ते सातवी गटात प्रथम-हर्षांक टेमकर, द्वितीय-काशिनाथ तेंडोलकर, तृतीय-दुर्वा गावडे, आठवी ते दहावी गटात प्रथम-राशी सातोसे, द्वितीय-मनोहर खाडे, तृतीय-निधी पेडणेकर यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण संजू हुले आणि प्रणय सावंत यांनी केले.

      महोत्सवाचा समारोप जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पपू परब, सायमन फर्नांडीस, ठाकरे सेनेचे वजराट युवा प्रमुख संदीप पेडणेकर, उभादांडा युवा प्रमुख सुजित चमणकर, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करून मंडळाला आपले सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. अजित राऊळ यांनी मंडळाच्या महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. त्यानंतर कुडाळ येथील चिमणी पाखरं अकॅडमीच्या नृत्यविष्काराने महोत्सवाची सांगता झाली.

      ‌‘गरूडझेप‌‘ महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जयेश राऊळ, उपाध्यक्ष मंगेश परब, सचिव सिद्धेश रेडकर, खजिनदार स्वप्निल पालकर, सदस्य विवेक राऊळ, अजित राऊळ, ज्ञानेश्वर रेडकर, अद्वैत आंदुर्लेकर, बापू वेंगुर्लेकर, कौशल मुळीक, अनंत रेडकर, रोहित रेडकर, अशोक कोलगांवकर, तुषार भाटकर, हितेश सावंत, बबन आंदुर्लेकर, संकेत राऊळ, निखिल नाईक, प्रांजल वेंगुर्लेकर, शिवानी राऊळ, मयुर रेडकर, हर्षद रेडकर, गौरव राऊळ, अनिकेत वेंगुर्लेकर, लोकेश शिरसाट, वेदांग वाडेकर, सागर शिरसाट, रसिक वेंगुर्लेकर, विजय आंदुर्लेकर, संजा भाटकर, संतोष नाईक आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu