प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या ‘याद तेचि येता‘ या मालवणी गीताला मराठी इंडिया म्युझिक अवॉर्डचे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुणे येथे या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते ‘मि.मा.‘ या ‘गौरव महाराष्ट्राच्या संगीत परपंरेचा‘ या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. सर्वोत्कृष्ट मालवणी गीतकार म्हणून दादा मडकईकर, सर्वोत्कृष्टसंगीतकार विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट गायिका प्रांजली बर्वे, सर्वोत्कृष्टध्वनी मिश्रण हा पुरस्कार इशान देवस्थळी यांना प्रदान करण्यात आला.