इस्त्रोसाठी विठ्ठल कोरगावकर आणि मयांक नंदगडकरची निवड

इस्त्रो सहलसाठी वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता नववीमधील कु. विठ्ठल प्रसाद कोरगांवकर आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडामधील मयांक मोहन नंदगडकर हे रवाना झाले असून त्यांना वेंगुर्ला येथून शुभेच्छा देण्यात आल्या.

      सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सिधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये २०२२ व २०२३-२४ या दोन वर्षात आठवी गटामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेले ४८ विद्यार्थी तिरूअनंतपुरूम येथील इस्त्रो विज्ञान सेंटर येथे अभ्यास दौ-यासाठी १८ मार्च रोजी रवाना झाले आहेत. यामध्ये वेंगुर्ल्यातील विठ्ठल कोरगांवकर व मयांक नंदगडकर यांचा समावेश आहे. हे दोन्ही विद्यार्थी वेंगुर्ला शाळा नं.१ चे माजी विद्यार्थी असून त्यांना श्रीनिवास सौदागर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Leave a Reply

Close Menu