सर्वोत्कृष्ट घोषवाक्य सुचवा आणि जिंका आकर्षक बक्षिसे!
नितांत सुंदर असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा इथले समुद्रकिनारे, डोंगररांगा, पुरातन मंदिरे, परिसर स्वच्छ राखणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्याचा निवांता हॉस्पिटॅलिटीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून स्वच्छ सिंधुदुर्ग घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकाने मराठी, मालवणी, आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत प्रत्येकी पाच घोषवाक्य म्हणजेच स्लोगन लिहून पाठवायची आहेत. मराठी, मालवणी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत जरी आपल्याला घोषवाक्य येत असेल तरीही किमान पाच घोषवाक्य लिहून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. आपली घोषवाक्य जितेंद्र वजराटकर 7588627005 या मोबाईल नंबरवर युनिकोड फॉन्टमध्ये टाईप करून पाठवावीत. सर्वोत्कृष्ट घोषवाक्य म्हणजेच सर्वोत्कृष्ट स्लोगनला खालील प्रमाणे आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक : निवांता सुरंगी कोकणी होम आसोली तालुका वेंगुर्ला येथे दोन व्यक्तींसाठी दोन रात्रीचा मुक्काम आणि जेवणांसहित राहण्याचा अनुभव! पारितोषिक विजेता व्यक्ती आपल्या मित्र/मैत्रीण, जोडीदार, भाऊ/बहीण किंवा आवडत्या व्यक्तीसोबत हा प्रवास अनुभवू शकतो.
द्वितीय क्रमांक : सुरंगी फेस्टिव्हल टी-शर्ट, निवांता टी-शर्ट, कॅप आणि कोकणातील चविष्ट स्नॅक्स यांचा आकर्षक गिफ्ट हॅम्पर. तसेच 20% सवलतीत निवांता कोकणी होम्समध्ये 2025 या वर्षभरात कधीही मुक्कामाची संधी!
तृतीय क्रमांक : निवांता टी-शर्ट, कॅप आणि कोकणी स्नॅक्स यांचा हॅम्पर. तसेच 15% सवलतीत निवांता कोकणी होम्समध्ये 2025 या वर्षभरात कधीही मुक्कामाची संधी.
प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून सर्व निवडलेल्या घोषवाक्यांना निवांता कॅप भेट म्हणून मिळेल.तसेच 5% सवलतीत निवांता कोकणी होम्समध्ये 2025 या वर्षभरात मुक्कामाची संधी!
तुमचे अनोखे आणि प्रभावी “स्वच्छ सिंधुदुर्ग” संदर्भातील घोषवाक्य 7588627005 या व्हाट्सअप नंबरवर युनिकोड फॉन्टमध्ये आपल्या नावासह दिनांक 15 मे 2025 पूव पाठवावे. सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट घोषवाक्य निवडले जाईल आणि विजेत्यांना अप्रतिम बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. लवकरात लवकर तुमचे घोषवाक्य पाठवा आणि कोकणातील निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घ्या!