वेंगुर्ले तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

         वेंगुर्ला तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या एकूण 30 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 एप्रिल रोजी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय येथे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सखाराम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. 50 टक्के आरक्षणानुसार 30 पैकी 15 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत.

    अनुसूचित जाती-मातोंड, नागरिकांचा मागास प्रवर्ग-वजराट, कुशेवाडा, मठ, अणसुर, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-परूळेबाजार, शिरोडा, भोगवे, म्हापण, खुला प्रवर्ग-तुळस, वेतोरे, चिपी, पाल, आडेली, कोचरा, रेडी, सागरतीर्थ, मोचेमाड, परबवाडा, खुला प्रवर्ग (महिला)-आसोली, पालकरवाडी, होडावडा, आरवली, केळुस, पेंडुर, दाभोली, मेढा, खानोली, उभादांडा, वायंगणी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, सातत्याने 15 वर्ष एकच आरक्षण कसे काय पडू शकते यावर उपस्थित पेंडूर सरपंच संतोष गावडे, होडावडे सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईक, परबवाडा उपसरपंच पपू परब, मेढा सरपंच अवधुत रेगे, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांनी आक्षेप घेत आरक्षणात सुधारणा करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Close Menu