वेंगुर्ला-तुळस येथील महेश राऊळ यांच्या रक्तमित्र संघटक म्हणून असलेले योगदान, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य, सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून भूमिका तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दिला जाणारा ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार-२०२५‘ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सतेज पाटील व जयंत आसगावकर यांच्या हस्ते श्री. राऊळ यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूर येथे संपन्न झाला. या पुरस्कारासाठी देशभरातून आलेल्या तीन हजारहून अधिक प्रस्तावांमधून महेश राऊळ यांची निवड करण्यात आली होती. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री.राऊळ यांचे अभिनंदन होत आहे.